रत्नागिरी: दुचाकी न दिल्याने प्रौढाला काठीने मारहाण; एकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी : प्रतिनिधी
दुचाकी न दिल्याच्या रागातून प्रौढाला काठीने मारहाण केल्याप्रकरणी एका विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची ही घटना बुधवार 14 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7.30 वा.सुमारास आठवडा बाजार येथे घडली.
दिपक राठोड असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्‍याच्या विरोधात संतोष भोजू राठोड (41,मुळ रा.सोलापूर सध्या रा.रहाटा घर,रत्‍नागिरी) याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्‍यानुसार, बुधवारी सायंकाळी फिर्यादीने दुचाकी न दिल्याच्या रागातून संशयित दिपक राठोडने फिर्यादीला काठीने मारहाण करत ठार मारण्याची धमकी देत फिर्यादीच्या दुचाकीवर लाथ मारुन नुकसान केले.