गोळपात गावठी दारूविक्री करणाऱ्यावर पूर्णगड पोलिसांत गुन्हा दाखल

रत्‍नागिरी : प्रतिनिधी
तालुक्यातील गोळप येथे बेकायदेशिरपणे गावठी दारु विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगणाऱ्या विरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवार 17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.35 वा.सुमारास करण्यात आली.
ओंकार रामचंद्र नैकर (25,रा.पावस नालेवठार वरचीवाडी,रत्‍नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्‍याच्या विरोधात पोलिस हवालदार विनोद कदम यांनी तक्रार दिली आहे. त्‍यानुसार,शनिवारी सायंकाळी संशयित हा बेकायदेशिरपणे गोळप येथील एका पडक्या भिंतीच्या आडोशाला आपल्या ताब्याती गावठी हातभट्टीची 1100 रुपयांची 10 लिटर दारु विक्रीसाठी बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली. त्‍याच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.