मेर्वी गुरववाडी शाळेत दांडिया उत्साहात

गावखडी /वार्ताहर
रत्नागिरी तालुक्यातील
मेर्वी गुरववाडी शाळेत सरस्वती पूजन करण्यात आले. तसेच कार्यक्रम मा.‌श्री मसरज शेख सर मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम सरस्वती च्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.त्या नंतर मुलांनी दांडीया नृत्य सादर केले. अतिशय आनंदी वातावरणात मुलांनी दांडी नृत्य चा अंगणवाडी व शाळेतील ‌सर्व मुलांनी ठेका धरला. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ.शाहानाज भाटकर सहशिक्षिका व सौ. सत्येश्री खर्डे अंगणवाडी सेविका,सौ.स्नेहल कुरतडकर मदनिस तसेच पालक आणि ग्रामस्थ , व्यवस्थापन समिती चे चांगले सहकार्य लाभले.

फोटो दिनेश पेटकर गावखडी