दि.१७ ऑक्टोबर २०२६ रोजी रत्नागिरी येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय शालेय स्केटिंग स्पर्धेत ईगल स्केटर्स क्लब, दापोलीच्या खेळाडूंची सुवर्ण कामगिरी.
कु. मुक्ता गोविलकर हिने ११ वर्षाखालील वयोगटात इनलाईन स्केटिंग प्रकारात सुवर्णपदक संपादन केले. मुक्ता ए.जी. हायस्कूल,दापोली या शाळेत शिकत आहे. व कु.आराध्या पाटणे ११ वर्षाखालील वयोगटात क्वॉर्ड स्केटिंग प्रकारात सुवर्णपदक संपादन केले. आराध्या सरस्वती विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल जालगाव दापोली येथे शिकत आहे. या दोघींची कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे.
या दोघींनी आंतरराष्ट्रीय खेळाडू कोच प्रथमेश दाभोळे व महिला प्रशिक्षिका सौ प्रिती दाभोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुवर्ण कामगिरी केली.
त्यांचे दापोलीत सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.













