दाभोली नं .१ शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन, बक्षीस वितरण उत्साहात संपन्न…

वेंगुर्ले : प्रतिनिधी

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, दाभोली नं. १ येथे शारदोत्सव २०२६ निमित्त वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा शनिवारी मोठ्या उत्साहात प्रा. डॉ. श्रीधर पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या सोहळ्याला पालक व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य श्री.विजय नाईक, पंचायत समिती सदस्य श्री. नितीन मांजरेकर, माजी पंचायत समिती सदस्य श्री. समाधान बांदवलकर, पंचायत समिती सदस्य श्रीम. शितल राऊत, उपसरपंच श्री. कृष्णा बांदवलकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. योगिता गोलतकर, ग्रामविकास अधिकारी मा.श्री. कृष्णा पेडणेकर, शिक्षणतज्ज्ञ श्री. केतन प्रभू खानोलकर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

सायंकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे विविध गुणदर्शनपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी गायन, नृत्य आदी कलाप्रकारांतून आपल्या सुप्त कलागुणांचे प्रभावी सादरीकरण केले. याशिवाय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या दशावतारी नाट्यप्रयोगाने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमात प्रा. डॉ. श्रीधर पेडणेकर यांचा शाळेच्या वतीने माजी पंचायत समिती सदस्य समाधान बांदवलकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.