ओटवणेत आज रंगणार 20×20 फुगडीचा जंगी सामना

ओटवणे (प्रतिनिधी )ओटवणे रवळनाथ मंदिर येथे नवरात्रौत्सवानिमित्त सामाजिक कार्यकर्ते बबलू गावकर यांच्या पुढाकारातून आर्थिक सहकार्यातून आज रात्रौ ८. ०० वाजता सखी फुगडी संघ पावशी विरुद्ध भैरव जोगेश्वरी फुगडी मंडळ कुडाळ यांचा आमने सामने फुगडीचा जंगी सामना रंगणार आहे. या फुगडीत पारंपरिक फुगडीला आधुनिकतेची जोड देत सामाजिक संदेश तसेच समाज प्रबोधन, झाडे लावा झाडे जगवा कुटुंब नियोजन लेक वाचवा, शिक्षण अभियान यासारख्या प्रशासनाच्या योजना असतील संदेश असेल दिला जाणार आहे तर खास आकर्षण शिवाजी महाराजांचा पोवाडा तसे दशावताराचीही झलक पाहायला मिळणार आहे.या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याच आवाहन बबलू गावाकर आणि रवळनाथ मंदिर नवरात्रौत्सव आयोजक यांच्यावतीने करण्यात आले आहे.