ओटवणेत सार्वजनिक नवरात्रौत्सवानिमित्त आज “ब्रम्हांडनायक”संगीत ट्रिकसीन युक्त.

 

ओटवणे (प्रतिनिधी ) श्री देव रवळनाथ वाचनालय पुरस्कृत सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ ओटवणे आयोजित नवरात्रौत्सवानिमित्त सप्तरंग कलामंच होडावडा यांचा श्रीं स्वामी समर्थांच्या जीवनावर आधारित नाट्य रसिकांनी व स्वामी भक्तांनी गौरविलेले महान पौराणिक दोन अंकी संगीत ट्रिकसीन युक्त नाट्यप्रयोग ब्रम्हांडनायक हा आज रात्रौ ठीक ९. ०० वाजता सादर होणार आहे.भक्ती भावाने नटलेल्या आणि नामांकित कलाकारांच्या भूमिकानी बहरलेल्या या कलाकृतीचा नाट्य रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सार्वजनिक नवरात्रौत्सव ओटवणे तसेच श्री देव रवळनाथ वाचनालय यांच्या वतीने करण्यात आले आहे.