रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळ, कै .सौ विजयालक्ष्मी (गोदुताई) श्रीकृष्ण (नाना) गांधी वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात वाणिज्य-अ च्या वर्ग 11 मध्ये श्रावणी शुक्रवार मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात मुख्याध्यापक / प्राचार्य श्री राजेंद्र कांबळे, पर्यवेक्षक श्री. मनोज जाधव, सौ. वर्षा जोशी, श्री सत्यवान कोत्रे, श्री .दत्तात्रय मांजरेकर, श्री. अतुल चौघुले आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला कनिष्ठ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख श्रीमती दीपिका कुलकर्णी आणि श्रीमती वृषाली घाणेकर उपस्थित होत्या. वर्गशिक्षिका सौ.मानसी चव्हाण यांनी दीपप्रज्वलन व शारदामातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ केला.11वी वाणिज्य-अ वर्गाच्या वर्ग मंत्रिमंडळातील वर्ग प्रमुख- कु. निधी चौघुले ,अभ्यास प्रमुख – कु. सानिका गावडे, सांस्कृतिक प्रमुख हिमांशी चौहान, शिस्त प्रमुख- पारस चौघुले स्वच्छता प्रमुख- तृणाल साळुंके, कु. साक्षी गणाचारी कु.ओंकार मोरे कु. सोहम कांबळे, कु. हिमांशी चौहान, कु. तुबा बोरकर, कु. सिद्धी रेवाळे ,कु. प्राची पवार विद्यार्थिनींनी पूजा-अर्चा करून देवीची सामूहिक आरती केली. विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमात श्रावणी शुक्रवारचे महत्त्व – कु. रिया संतोष करंबळे’ हिने सांगितले. विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले.कु.रिया करंबळे हिने श्रावण महिन्यातील गीत सादर करून श्रावण महिन्याचे महत्व सांगितले.
मुलांनी संगीत खुर्ची, अंताक्षरी, हत्तीला शेपूट लावणे ,फुगड्या व विविध खेळ सादर करून आनंद व्यक्त केला. वर्गशिक्षिका सौ.मानसी चव्हाण यांनी श्रावण महिन्यातील सण आणि उत्सवाविषयी माहिती मनोगतातून सांगितली.पर्यवेक्षक श्री.मनोज जाधव यांनी इयत्ता 11वी कॉमर्स-अ वर्गाला भेट देऊन चांगल्या नियोजनाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.कार्यक्रमास सौ.प्राजक्ता कुलकर्णी, सौ.वृंदाली गुरव, सौ.शुभांगी शिंदे व इतर मान्यवर शिक्षक उपस्थित होते. मोठ्या उत्साहाच्या वातावरणात मुख्याध्यापक श्री राजेंद्र कांबळे व पर्यवेक्षक श्री. मनोज जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी अल्पोपाहाराचा आनंद घेत उत्साहात कार्यक्रम साजरा केला.












