साटवली येथील पुरातन विठ्ठल-रखुमाई-सत्यभामा मंदिरात हरिनाम सप्ताह सुरू

इसवी सन १६४० मध्ये बांधलेले पुरातन मंदिर

लांजा( प्रतिनिधी) तालुक्यातील साटवली येथील इसवी सन १६४० मध्ये बांधण्यात आलेल्या पुरातन विठ्ठल- रखुमाई-सत्यभामा मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली असून यामध्ये साटवली गावातील भंडारवाडी, बाजारपेठ ,तेलीवाडी येथील सर्व भाविक या हरिनाम सप्ताहामध्ये सहभागी झाले आहेत.

साटवली येथील या विठ्ठल रखुमाई सत्यभामा मंदिराला ऐतिहासिक आणि पुरातन वारसा असून याला एक ऐतिहासिक संदर्भ सांगितला जातो आणि तो म्हणजे,एक व्यापारी समुद्रामार्गे विठ्ठल रखुमाई सत्यभामा या देवांच्मूया मूर्ती गलबतामध्ये (जहाज) घेऊन प्रवास करत होता . सदर व्यापाऱ्याचे नाव गजशेठी श्रीपती गुजर हे होय. समुद्रा मार्गे गलबताने प्रवास करत असताना मोठे वादळ झाले व त्यांची नाव इकडे तिकडे भरटली.भरकटल्यानंतर संबंधित गुजर याने देवाकडे प्रार्थना केली की, माझी नाव ज्या किनार्यावर लागेल तिथे या तीन मूर्तींची मी स्थापना करेन. रत्नागिरी जिल्ह्यातील साटवली गाव येथे जनार्दन देवाचे मंदिर आहे त्या ठिकाणी तुझे नाव लागेल असा त्याला साक्षात्कार झाला व साटवली बंदर येथे त्याची नाव लागली.

त्या ठिकाणी माझे मूर्तींची स्थापना कर असे देवाने त्याला दृष्टांता दिला. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांना घेऊन या ठिकाणी मंदिराची स्थापना करण्यात आली. त्यानंतर २१ ऑक्टोंबर १६३९ रोजी विठ्ठल रखुमाई सत्यभामा मंदिराचे कामाला सुरुवात झाली. व इसवी सन २२ एप्रिल १६४० रोजी या मंदिराचे काम पूर्ण झाले.सध्या या ठिकाणी देवाचे पुजारी म्हणून श्री पंडित या देवाची पूजा अर्चा करतात. तेव्हापासून विठ्ठल- रखुमाई -सत्यभामा मंदिरात साटवली गावातील भंडारवाडी ,बाजारपेठ,व तेलीवाडी हे नित्यनेमाने देवाचा हरिनाम सप्ताह करीत आहेत. तेव्हापासून आजतागायत चालू आहे .सदरचा सप्ताह दिवस- रात्र सुरू आहे. सप्ताह सात दिवस चालू असतो. यासाठी साटवली गावातील आजूबाजूचे भाविक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित राहून विठ्ठल -रखुमाई -सत्यभामा या देवांची भक्तीभावे देवासमोर प्रार्थना करतात.