शिवसेना शिंदे गटाचे वतीने राजापूरात स्व. आनंद दिघे यांची पुण्यतिथी साजरी

 

राजापूर (वार्ताहर): राजापूर तालुका शिवसेनेच्या वतीने शिवसेना पक्षाचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख स्व. आनंद दिघे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी स्व. आनंद दिघे यांना अभिवादन करण्यात आले.शिवसेना राजापूर संपर्क कार्यालयात आयोजित या पुण्यतिथी कार्यक्रम प्रसंगी तालुकाप्रमुख अशफाक हाजू यांच्या हस्ते स्व. आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच यावेळी उपस्थीत पदाधिकारी व शिवसेना कार्यकर्त्यांनी दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख सौरभ खडपे, नाना कोरगावकर, प्रज्योत खडपे, अजित घाणेकर आदींसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते. यावेळी स्व. आनंद दिघे यांनी ठाणे जिल्ह्यात सर्व समाजासाठी केलेल्या कार्याचा गौरवपर उल्लेख करताना संघटना वाढविताना स्व. आनंद दिघे यांचा आदर्श प्रत्येकाने ठेवला पाहिजे असे प्रतिपादन अशफाक हाजू यांनी केले.