भालावल येथे संतोषी स्वयं-सहाय्यता समूहाच्या सेंद्रिय निविष्ठा केंद्राचे उत्साहात उद्घाटन

सावंतवाडी: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत, महिला किसान सशक्तीकरण परियोजना प्रकल्पातील एकात्मिक शेती प्रभाग विकास प्रकल्पाच्या (IFC) माध्यमातून आंबोली येथील श्री सद्गुरू साटम महाराज प्रभाग संघांतर्गत येणाऱ्या माऊली महिला ग्रामसंघ, भालावल येथील संतोषी स्वयं-सहाय्यता समूहामार्फत सुरू करण्यात आलेल्या सेंद्रिय निविष्ठा केंद्राचा शुभारंभ सेवा संकल्प अभियानांतर्गत शनिवार, दिनांक १७ ऑक्टोबर २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या सेंद्रिय निविष्ठा केंद्राचे उद्घाटन गावाचे उपसरपंच, समूहाच्या अध्यक्षा, सचिव तसेच तालुका अभियान व्यवस्थापक स्वाती रेडकर मॅडम यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आले. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे आणि महिलांना रोजगाराची नवीन संधी उपलब्ध करून देणे हा या केंद्राचा मुख्य उद्देश आहे.

या सोहळ्यास तालुका अभियान व्यवस्थापक स्वाती रेडकर मॅडम, कृषी सहाय्यक मॅडम, प्रभाग समन्वयक श्री. गजानन राठोड सर, प्रभाग संघ व्यवस्थापक मंजिरी बांदेकर मॅडम, IFC ब्लॉक अँकर कनक सुकी, वरिष्ठ CRP सत्यभामा परब, ग्रामसखी लक्ष्मी परब यांच्यासह LSC समितीचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी कर्मचारी, इतर कॅडर तसेच माऊली महिला ग्रामसंघाचे अध्यक्ष, सचिव आणि संतोषी स्वयं-सहाय्यता समूहातील सर्व पदाधिकारी व महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करून महिलांच्या या व्यवसायाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.