खेड :
चिपळूण तालुक्यातील अनधिकृत चिरा दगड खाणींमुळे शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडत असल्याची बाब राज्यमंत्री गृह (शहरे), महसूल व ग्रामविकास मंत्री मा. श्री. योगेशदादा कदम यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते विद्याधर दत्ताराम साळुंखे प्रयत्न करत होते. हीच संधी साधून संशयित आरोपी रविराज चिखले याने तो राज्यमंत्री मा. श्री. योगेशदादा कदम यांचा पी.ए. (पर्सनल असिस्टंट) नसतानाही, स्वतः राज्यमंत्री महोदयांचा पी.ए. असल्याचे खोटे भासवत फिर्यादींना मंत्री महोदयांशी भेट घडवून देण्याचे आणि त्यांचे काम करून देण्याचे आश्वासन दिले. या कामासाठी संशयित आरोपीने १७ सप्टेंबर २०२६ रोजी खेड येथे फिर्यादीकडून ५,००० रुपये रोख रक्कम उकळली; मात्र, राज्यमंत्री मा. श्री. योगेशदादा कदम यांच्याशी कोणतीही भेट न घडवून आणता व काम न करता फिर्यादीची फसवणूक केली. याप्रकरणी विद्याधर साळुंखे यांच्या तक्रारीवरून १८ ऑक्टोबर २०२६ रोजी खेड पोलीस ठाण्यात संशयित आरोपी रविराज चिखले याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.













