शिवसेना युवासेनेची मंडणगड तालुका कार्यकारिणी जाहीर

तालुका व विभाग स्तरावरील विविध पदांवर नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

मंडणगड (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आदेशानुसार युवासेनेचे तालुकाप्रमुख विकास पवार यांनी मंडणगड तालुका युवासेनेची कार्यकारिणी नुकतीच जाहीर केली आहे. यामध्ये तालुका स्तरासह विविध विभागांतील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
तालुका कार्यकारिणीमध्ये तालुका संघटकपदी रुपेश निगुडकर, तालुका सचिवपदी धीरज कदम, तालुका समन्वयकपदी अजहर मुकादम, तर सल्लागारपदी नागेश घोसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
देव्हारे विभाग : उपतालुकाप्रमुखपदी सुरज घोसाळकर, विभाग अधिकारीपदी किरण धामणे, उपविभाग अधिकारीपदी किरण माळी, विभाग संघटकपदी आशिष तांबे, तर उपविभाग संघटकपदी विनोद भागणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पालवणी विभाग : विभाग अधिकारीपदी प्रतेश सकपाळ, तर उपविभाग अधिकारीपदी सुशील वजिरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उमरोली विभाग : उपतालुका अधिकारीपदी सागर जाधव, विभाग अधिकारीपदी प्रतीक मोरे, उपविभाग अधिकारीपदी विनोद पांगरकर, विभाग संघटकपदी सुनील लांजेकर, तर उपविभाग संघटकपदी संतोष धाडवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिरगाव विभाग : उपतालुकाप्रमुखपदी प्रशांत दिवेकर, विभाग अधिकारीपदी विजय दुर्गवले, उपविभाग अधिकारीपदी शुभम भोसले, विभाग संघटकपदी अविनाश म्हाप्रळकर, तर उपविभाग संघटकपदी नरेश पातेरे यांची निवड करण्यात आली आहे.
भिंगळोली विभाग : उपतालुकाप्रमुखपदी आदिनाथ घोरपडे, विभाग अधिकारीपदी निलेश मोरे, उपविभाग अधिकारीपदी सोहम पारेख, विभाग संघटकपदी सुरज यादव, तर उपविभाग संघटकपदी प्रफुल्ल होडबे यांची निवड करण्यात आली आहे.
मंडणगड तालुक्यात युवासेनेची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. सर्व नवनियुक्त युवा पदाधिकाऱ्यांचे गृहराज्यमंत्री योगेश कदम, शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर आणि युवासेनेचे तालुकाप्रमुख विकास पवार यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.