देवरूख (प्रतिनिधी)
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने विभागीय तायक्वांदो स्पर्धा 2026-27 श्री वारणा विद्यालय, वारणानगर ता. पन्हाळा जि. कोल्हापूर या ठिकाणी दिनांक 01 ते 03 ऑक्टोबर 2026 दरम्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाली या स्पर्धेसाठी संगमेश्वर तालुका तायक्वांदो अकॅडमीच्या तायक्वांदोपट्टूंची निवड विभागीय स्पर्धेसाठी जिल्हा संघामध्ये झाली होती.
यामध्ये कु. यशराज कटके – रौप्य पदक अरुंधती अरुण पाध्ये इंग्लिश मीडियम स्कुल देवरुख,भुमिका शिंदे – रौप्य पदक मीनाताई ठाकरे कॉलेज साडवली,सिया सागवेकर- कांस्य पदक मीनाताई ठाकरे कॉलेज साडवली,आदित्य चिपळूणकर – कांस्य पदक मीनाताई ठाकरे हायस्कूल साडवली,रितिशा कांगणे – सहभाग अरुंधती अरुण पाध्ये इंग्लिश मीडियम स्कुल देवरुख,अफजान फुलारी- सहभाग न्यू इंग्लिश स्कूल देवरुख,श्रावणी ईप्ते – सहभाग लोक विद्यालय तुळसणी,अधिराज कदम – सहभाग – अरुंधती अरुण पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूल देवरुख,सोहम चव्हाण – सहभाग कसबा इंग्लिश मिडीयम हायस्कूल या खेळाडूंनी जिल्हामधून सुवर्णपदक पटकावलेल्या खेळाडूंशी दोन हात करून अतिशय उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत पदक प्राप्त केले.
या यशस्वी तायक्वांदो पट्टुंना शुभेच्छा देण्याचा छोटेखानी सत्कार समारंभ तायक्वांदो क्लब देवरुख या ठिकाणी क्लब अध्यक्षा तालुका उपाध्यक्षा सौ.स्मिता लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी, माजी नगरसेवक प्रफुल्ल भुवड, प्रमुख प्रशिक्षक शशांक घडशी, क्लब उपाध्यक्ष संदेश जागुष्टे, क्लब सदस्या रूपाली कदम, पालक प्रतिनिधी अदिती लोध, प्रशिक्षक स्वप्निल दांडेकर, साईप्रसाद शिंदे, सुमित पवार, मयुरी राऊत आदी उपस्थित होते. या खेळाडूंच्या यशाबद्दल तालुका अँकॅडमीचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. सुभाषजी बने, तालुक्याचे आमदार शेखर निकम,माजी राज्यमंत्री रविंद्र माने, जिल्हापरिषद माजी अध्यक्ष रोहन बने,देवरुख गावच्या नगराध्यक्ष मृणाल शेट्ये,जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे,
जिल्हा संघटना अध्यक्ष व्यंकटेश्वरराव कररा, नगरपंचायतचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले, माजी उपनगराध्यक्ष अभिजीत शेट्ये, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्त्ये,क्लब उपाध्यक्षा ॲड. सौ पुनम चव्हाण,अँकॅडमीचे उपाध्यक्ष परेश खातू, लायन्स तायक्वांदो क्लब अध्यक्ष दिलीप रहाटे,क्लब सदस्या स्वाती नारकर,तालुका समन्वय अभिजीत कदम,तालुक्याचे खजिनदार चिन्मय साने, मीनाताई ठाकरे हायस्कूलचे मुख्याध्यापक बलवंत नलावडे,अरुंधती अरुण पाध्ये स्कूलचे मुख्याध्यापक सोनाली नारकर, देवरुख हायस्कूलचे मुख्याध्यापक कोकणी सर, लोक विद्यालय तुळसणी हायस्कूलचे मुख्याध्यापक साक्षी नलावडे, कसबा इंग्लिश मिडीयम हायस्कूलचे मुख्याध्यापक अस्मा जुवळे सिनियर खेळाडू सौरभ वनकर, निखिल लाड, सानिका प्रसादे,संकेत मापुस्कर,पंकज मेस्त्री, सुशांत मेस्त्री,सिद्धी केदारी,वेदांत गिड्ये,गायत्री शिंदे,आदींनी अभिनंदन केले.












