पाचरळ फाटा येथे पोलिसांची कारवाई; ६ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त
मंडणगड प्रतिनिधी : तालुक्यातील पाचरळ फाटा येथील एका हॉटेलच्या पाठीमागे अवैधरीत्या देशी दारू व बिअर चा साठा विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याप्रकरणी मंडणगड पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत एकूण ६ हजार २४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार, २२ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६.१० वाजण्याच्या सुमारास पाचरळ फाटा येथे ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पोलीस हेड कॉनस्टेबल वैशाली सुकाळे यांनी आरोपीताचे विरोधात पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १२६/२०२६ अन्वये व महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील आरोपीताचे नाव सचिन शांताराम खताते (वय ४३, रा. मंडणगड, ता. मंडणगड) असे आहे. त्याच्याकडे देशी दारू व बिअरचा साठा आढळून आल्याचे पोलिसांनी नमुद केले केले आहे. पोलीसांनी केलल्या या धडक कारवाईत ३ हजार ८४० रुपये किमतीच्या १८० मिली क्षमतेच्या देशी दारूच्या ४८ प्लास्टिक बाटल्या, तसेच २ हजार ४०० रुपये किमतीच्या ७५० मिली क्षमतेच्या ट्युबर्ग बिअरच्या १२ काचेच्या बाटल्या असा एकूण ६ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच पुढील तपास पोलीस करीत आहेत.













