रणझुंजार ३८+ च्या बसस्टॉप चे शानदार उदघाटन.
ओटवणे (प्रतिनिधी )रणझुंजार ३८+ ओटवणे ने बांधलेल्या प्रवासी थांब्याच उदघाटन दसऱ्याच्या शुभ मुहूर्थावार सावंतवाडी संस्थांनचे राजे खेम सावंत भोसले,राणी शुभदा देवी भोसले यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी रणझुंजार चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
३८+ क्रिकेट क्लब या नावाने सुरु झालेला,जुन्या खेळाडूंना पुनः मैदानात उतरता यावं व्यस्त संसारातून थोडा का असेना विरंगुळा मिळावा या हेतूने सुरु झालेला या मंडळाचा प्रवास बस स्टॉप वर येऊन विसावला.फक्त तो विसावला थांबणार कधीच नाही गावच्या विकासाची नवी स्वप्ने घेवून थोडासा थांबलेला प्रवास पुनः सुरु करून मोठी भरारी घेण्यासाठी रणझुंजार सज्ज झाले आहेत. आतापर्यंत च्या तीन ते चार वर्षाच्या प्रवासात मंडळाची सुरुवात झाली क्रिकेट स्पर्धेने, त्यानंतर रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, वृक्षारोपण, राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेला सहभाग आणि सहकार्य, नुकतच पार पडलेल महाआरोग्य शिबीर, आणि सर्वात मोठ यश म्हणजे रुग्णांसाठी मोफत रुग्णवाहीकेची सोय आणि आता उन्हातून थकून भागून चालणाऱ्या प्रवाशांना ग्रामस्थाना काही काळ विसाव्यासाठी बसस्टॉप ची व्यवस्था हे सर्व एखाद्या ग्रामीण भागातील मंडळाने फक्त 3 ते 4 वर्षात केले हे जरी स्वप्नवत वाटत असल तरी सत्यात उतरविले ते रणझुंजार 38+ ओटवणे या मंडळाने आज संपूर्ण जिल्ह्यासाठी आदर्श आणि प्रेरणादायी कार्य केले.अवघ्या चार दिवसात सुसज्ज बस स्टॉप तयार झाला आणि त्याचे उदघाटन झाले सावंतवाडी संस्थानचे राजे खेम सावंत भोसले यांच्या हस्ते.यावेळी उदघाटन प्रसंगी बोलताना संस्थांनचे खेम सावंत भोसले यांनी मंडळाचे कौतुक करताना आपल्या संस्थानला गतवैभव मिळाले त्या ओटवणे गावाला आपण कधीच विसरणार नाही.म्हणून आपण दसरोत्सवाला आवर्जून हजर असतो.ओटवणे गावात रणझुंजार ३८+ मंडळ निस्वार्थी भावनेने करीत असलेले काम खरंच कौतुकास्पद आहे तसेच विकासाची खरी सुरुवात ही गावातूनच व्हायला हवी आणि आपलं मंडळ अनेक उपक्रम राबविते ही तर खूपच गौरवाची गोष्ट आहे.तसेच यावेळी संस्थानच्या राणी शुभधाभोसले यांनीही मंडळाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्यात व आपणाला अशा कार्यक्रमाला उपस्थित राहता आल हे आमच भाग्य असल्याचे त्यांनी बोलून दाखविले.या कार्यासाठी आपल्या स्वतः कडून आर्थिक सहकार्य केले. यावेळी गावप्रमुख रणझुंजार चे सक्रिय कार्यकर्ते रवींद्रनाथ गावकर,रवींद्र म्हापसेकर, अजित आंगचेकर, किरण गावकर,शेखर गावकर,अनंत तावडे, आनंद मयेकर, मिलिंद म्हापसेकर, नरेंद्र कवीटकर, बाळा गवंडे,ज्ञानेश्वर मयेकर,विश्राम केळुस्कर,पत्रकार दीपक गावकर, तीळाजी जाधव,जयसिंग गावकर, गुंडू जाधव, राजन रासम,ज्ञानेश्वर गावकर,बाळू गावकर, राजन तारी, सगुण गावकर,विश्वनाथ बोर्ये,गजानन रासम,नंदा कासकर,आदी रणझुंजार चे कार्यकर्ते,मान्यवर होते.













