अशोकराव कदम मित्र मंडळ दसपटीतर्फे वारकरी संप्रदायाचा दसरा मेळावा उत्साहात

चिपळूण (प्रतिनिधी) : श्री अशोकराव कदम मित्र मंडळ दसपटी, पूर्व विभाग यांच्यावतीने वारकरी संप्रदाय व मित्रमंडळाचा दसरा मेळावा विजयादशमीनिमित्त आकले येथील श्री केदारेश्वर मंदिरात दुपारी उत्साहात संपन्न झाला. यावेळी अशोक कदम यांच्याकडून वारकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी तिवरे, रिक्टोली, तिवडी, कादवड, आकले, दादर, नांदिवसे, ओवळी, कळकवणे, गाणे, वालोटी, मोरवणे, दळवटणे, नवीन कोळकेवाडी, पेढे, परशुराम, वालोपे, कळंबस्ते, खडपोली, पेढांबे, कोळकेवाडी, अलोरे, शिरगाव परिसरातील शेकडो वारकरी व शेतकरी उपस्थित होते. त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला जि.प.चे माजी विरोधी पक्षनेते, खविसचे माजी चेअरमन अशोक कदम, नरसिंग शिंदे, मनोहर महाराज धांगडे-शिरगाव, दादरचे संदीप पवार, नारायण सकपाळ, विश्वास शिंदे-रिक्टोली, प्रदीप शिंदे नांदिवसे-गणेशपूर महादेव शिंदे, चंद्रकांत सकपाळ, सखाराम मोरे, तंटामुक्त समिती राधानगर महेश शिंदे, संतोष शिंदे-कादवड, अॅड. अमित कदम, दत्ताराम शिंदे, विलास सकपाळ, अनंत सकपाळ, मानसिंग कदम, बाळ धुळप, भरत शिंदे, संभाजी कदम, संदीप सकपाळ, राहुल शिंदे, विपुल शिंदे, विकास शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.