भगवान परशुराम पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी अभय सहस्त्रबुद्धे तर सरचिटणीसपदी सुनील गमरे बिनविरोध

चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील पेढे परशुराम येथील भगवान परशुराम पंचक्रोशी शिक्षण मंडळाची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिण् १८ ऑक्टोबर रोजी पार पडली. या बैठकीत सर्वानुमते कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली. त्यानुसार संस्थेच्या अध्यक्षपदी अभय सहस्त्रबुद्धे यांची तर सरचिटणीसपदी सुनील सोमा गमरे यांची सहाव्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली.
भगवान परशुराम पंचक्रोशी शिक्षण मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. या बैठकीत २०२६-२७ ते २०३०-३१ या कालावधीसाठी नवीन कार्यकारणी निवडण्यात आली. ही निवड प्रक्रिया बिनविरोध झाली. निवडून आलेल्या संचालक मंडळामध्ये उपाध्यक्ष म्हणून विष्णू धाकटू कोकिरकर, सुधीर सिताराम माळी, सहसेक्रेटरी म्हणून अमोल परशुराम वारे, कोषाध्यक्ष सुरेश सिताराम बहुतले यांची निवड करण्यात आली आहे. तसेच संचालक म्हणून दिलीप पांडुरंग माळी, सुहास धोंडू बहुतले, कमलाकर लक्ष्मण उमासरे, प्रवीण रामचंद्र पाकळे, विश्वास विष्णू जोशी, सुरेश रामचंद्र पवार, दत्ताराम लक्ष्मण पानकर, जनार्दन गणपत मालवणकर, धोंडीराम विठ्ठल कदम, आशिष अशोक सुर्वे, विलास हरिश्चंद्र संसारे आणि तज्ञ संचालक म्हणून विनायक दत्तात्रय माळी, श्रीमती उज्वला सुहास दौंडे यांची निवड करण्यात आली. संस्थेचे सल्लागार म्हणून महेश धोंडूराम कदम, संतोष भिकाजी पानकर, डॉ. नंदकुमार महादेव काजारे, संदेश मनोहर आयरे, रमेश काशीराम खळे, मधुकर बापू मोरे यांची तर अंतर्गत हिशोब तपासणीस म्हणून नामदेव काशीराम मोरे, शासकीय लेखा परीक्षक म्हणून व्ही. के. रेळेकर आणि संस्थेचे कार्यालयीन सचिव म्हणून दिवाकर जाधव यांची फेरनिवड करण्यात आली. या नवनियुक्त संचालक मंडळाचा सत्कार समारंभ शाळेच्या रामकृष्ण स्मृती सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात नवनियुक्त पदाधिकारी व संचालक यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास सर्व नवनियुक्त संचालक मंडळ तसेच माजी संचालक ही उपस्थित होते.