रत्नागिरी : सामाजिक वनीकरण विभाग रत्नागिरी, हरित सेना व इको क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने वन्य जीव सप्ताह रा.भा. शिर्के प्रशालेत साजरा करण्यात आला. यानिमित्त इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेसाठी ८२ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून प्रथम चार क्रमांकांना सामाजिक वनीकरण विभागाकडून विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.
या कार्यक्रमासाठी वन विभागाकडून अनिल दळवी वनपाल सामाजिक वनीकरण रत्नागिरी, यशवंत सावर्डेकर वनपाल सामाजिक वनीकरण रत्नागिरी, आरती खेडेकर वनरक्षक, काजल शुक्ल वनरक्षक, शर्वरी कदम वनरक्षक प्रादेशिक रत्नागिरी, विराज संसारे वनरक्षक प्रादेशिक रत्नागिरी. असे अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते. अनिल दळवी, शर्वरी कदम यांनी वन्यजीव सप्ताह याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले तसेच प्राण्यांची संख्या व जंगलातील झाडांची संख्या कशी वाढवता येईल याविषयी विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली.













