गौरव पोंक्षे माखजन: २२ ऑक्टोबर २०२६ पासून रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण अधिकारी पदी शिक्षण विभागात प्रदीर्घ अनुभव असलेले श्री नागनाथ शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.रत्नागिरी जिल्हा परिषदेचा माध्यामिक शिक्षण अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार उपशिक्षणाधिकारी असलेल्या दीपक मेंगाणे यांच्या कडे होता.आता श्री दीपक मेंगाणे हे उपशिक्षणाधिकारी असणार आहेत.
एक वर्षाच्या कार्यकाळात श्री दीपक मेंगाणे यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार सांभाळताना पदाचा आब राखला,आणि पारदर्शक,गतिमान,लक्षवेधी,कामावर भर देऊन शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,आणि एकूणच
शिक्षण व्यवस्थेला न्याय दिला.
नव्याने रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी पदावर आलेल्या श्री नागनाथ शिंदे यांना अगदी शिक्षकी पेक्षा ते विविध अधिकारी पदांचा प्रदीर्घ अनुभव आहे.१९९१ ते २००६ अहिल्यानगर च्या जामखेड येथे प्राथमिक शिक्षक म्हणून काम केले.२००६ ते २०११ अहिल्यानगरच्या श्रीरामपूर पंचायत समितीत शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून काम केले.२०११ ते २०१५ बीड च्या गेवराईत गटशिक्षण अधिकारी राहिले.२०१५ ते १९ मध्ये बीड च्या अंबाजोगाईत गटशिक्षणाधिकारी,२०१९ ते २०२२ अहिल्यानगर च्या जामखेड मध्ये गटशिक्षणाधिकारी म्हणून काम केले.२०२२ ते २०२५ पर्यंत जिल्हा परिषद बीड येथे माध्यमिक शिक्षणाधिकारी,२०२५ ते ऑक्टोबर २०२६ पर्यंत प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून लातूर येथे कार्यरत होते.२२ ऑक्टोबर २०२६ पासून ३५ वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवानंतर रत्नागिरी जिल्हापरिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी पदी विराजमान झाले आहेत.अतिशय शांत व शिस्त प्रिय असलेल्या नागनाथ शिंदे यांच्या नियुक्तीनंतर त्यांचे शिक्षक संघटना व शिक्षण विभागाकडून स्वागत व शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.













