मराठी स्किट स्पर्धेत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाला रौप्यपदक
रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवात गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाने आपल्या सांस्कृतिक यशाची परंपरा कायम राखत मराठी स्किट स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. विविध सांस्कृतिक स्पर्धांनी रंगलेल्या या महोत्सवात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनयकौशल्याच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन करत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
मराठी स्किटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनयकौशल्याचे, संवादफेकीचे आणि सांघिक समन्वयाचे प्रभावी दर्शन घडवले. आशयपूर्ण लेखन, सादरीकरणातील सहजता आणि रंगमंचावरील प्रभावी अभिनय यांच्या जोरावर विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या मेहनतीला आणि कलात्मक सादरीकरणाला रौप्यपदकाच्या रूपाने यशाची पावती मिळाली.
या मराठी स्किटचे लेखन कोणती कुंदन सागवेकर आणि यतीन पवार आणि दिग्दर्शन यतीन पवार यांनी केले. त्यांच्या कल्पक लेखनातून आणि प्रभावी दिग्दर्शनातून स्किटला आकर्षक स्वरूप प्राप्त झाले. विषयाची मांडणी, पात्रांची उभारणी आणि सादरीकरणातील बारकावे यांमधून त्यांच्या सर्जनशीलतेचे दर्शन घडले.
या यशस्वी सादरीकरणात तन्मय डांगे, अथर्व पवार, राज शिंदे, कुंदन सागवेकर, सोहम नारकर आणि सार्थक चव्हाण यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनयकौशल्याच्या आणि सांघिक प्रयत्नांच्या जोरावर महाविद्यालयाला रौप्यपदक मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले. डिपार्टमेंट ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या नाट्य विभागाचे प्राध्यापक प्रा. ओंकार रसाळ,प्रा.आर्या वंडकर ,प्रा.साई जिरोळे, BPA विभाग प्रमुख डॉ.आनंद आंबेकर यांनी BPA विद्यार्थांना मार्गदर्शन केले होते.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालय दरवर्षी मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात विविध सांस्कृतिक स्पर्धांमध्ये सहभागी होत उल्लेखनीय कामगिरी करत असते. यंदा मराठी स्किट स्पर्धेत मिळालेले रौप्यपदक महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब ठरले आहे. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देणारे आणि त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणारे महाविद्यालयाचे सांस्कृतिक उपक्रम या यशातून अधोरेखित झाले आहेत.
सदर यशस्वी विद्यार्थिनीचे अभिनंदन कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री सतीश शेवडे, सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर प्राचार्य डॉ.मकरंद साखळकर प्रशासकीय उपप्राचार्य डॉ.सुरेंद्र ठाकूरदेसाई ,कला शाखा उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये ,वाणिज्य शाखा उपप्राचार्य डॉ.सीमा कदम ,विज्ञान शाखा उपप्राचार्य डॉ.अपर्णा कुलकर्णी , सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.आनंद आंबेकर यांनी अभिनंदन केले आहे.













