मंडणगड प्रतिनिधी : दिवाळीचे निमीत्ताने आनंदविहार योगश्रम यांच्यावतीने तळेघर येथे वृध्दांकरिता दोन दिवस विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच आदर्श वानप्रस्थाश्रम गौरव आणि सर्वांसाठी दिवाळीचा फराळ असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या माध्यमातून आश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना सणाचा आनंद घेता यावा, त्यांच्यातील परस्पर स्नेह वृद्धिंगत व्हावे आणि त्यांना आपलेपणाची भावना अनुभवता यावी, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे. या उपक्रमात समाजातील दानशूर व्यक्ती, नागरिक आणि सामाजिक संस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन या निमीत्ताने करण्यात आले आहे. इच्छुकांनी आश्रमात प्रत्यक्ष भेट देऊन ज्येष्ठांसोबत दिवाळीचा आनंद साजरा करावा, त्यांच्यासाठी फराळ किंवा मिठाई आणावी अथवा आर्थिक स्वरूपात मदत करून या सामाजिक कार्यात आपले योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आनंदविहार आश्रमाच्या विधायक कार्यात आपलेही योगदान द्या, असे आवाहन दीनेश पेडणेकर यांनी केले आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारा आणि त्यांना सणाचा आनंद देणारा हा उपक्रम समाजातील माणुसकी, संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रेरणादायी प्रयत्न ठरणार आहे.












