मंडणगड प्रतिनिधी: महसुल विभागाने तहसिल कार्यालयाचे माध्यमातून तालुक्यात राबविलेल्या पाणंद योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी नंतरही मंडणगड तालुक्यातील अनेक वाडी-वस्त्यांना अंतर्गत जोड रस्त्याने पाणवठा किंवा शेतजमीनशी जोडण्याची प्रतिक्षा कायम आहे. अनेक वाड्यांना मुख्य रस्त्यांपासून वाडीतील मानवी वस्तीपर्यंत जाणाऱ्या पक्क्या रस्त्यांची प्रतीक्षा आहे. स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तर वर्षांनंतरही समस्या कायम आदिवासी व दुर्गम वाड्यांना मुख्य रस्त्यांशी जोडण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत असताना महसुल विभागाने पाणंद रस्त्यांचे नोंदणीकरिता नव्याने राबविलेल्या योजना केवळ बाहेरुन तालुक्यात आलेल्या व जमीनीत मोठ्या प्रमाणावर गंतवणुक केलेल्या बड्या शेतकऱ्यांसाठी राबविण्यात आली का असा प्रश्नही समस्याग्रस्त शेतकऱ्यांमधून या निमीत्ताने उपस्थित केला जात आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्षे पूर्ण झाली, तरी तालुक्यातील काही वाडी-वस्त्यांपर्यंत अद्याप पक्के रस्ते पोहोचलेले नाहीत. धुत्रोली आदिवासीवाडी, शिरगाव धनगरवाडी, शिपोळे बौद्धवाडी, कुडूक खुर्द गवळवाडी आणि भिंगळोली आदिवासीवाडी वाड्यांतील नागरिकांना आजही रस्त्यांच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. या वाड्यापर्यंत मुख्य रस्तापासून आजही पायवाटाच आहे त्या रस्त्याची कोठेही नोंद नाही त्यामुळे खाजगी मालकीच्या जागेतून जाणाऱ्या या रस्त्याचे पक्या रस्त्यांत रुपांतर करणे त्याकरिता त्यावर विकास निधी खर्च करणे शक्य होणार नाही. ग्रामीण भागाच्या विकासासाठी रस्ते ही मूलभूत गरज आहे. मात्र, पक्क्या रस्त्यांअभावी या वाडी-वस्त्यांमधील नागरिकांना दळणवळण, शिक्षण, आरोग्यसेवा तसेच दैनंदिन कामांसाठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. विशेषतः पावसाळ्यात अशा भागांतील वाहतुकीचा प्रश्न अधिक गंभीर होत असतो. या समस्येकडे महसलु विभागाने गार्भीयाने लक्ष देऊन तालुक्यातील रस्त्यापासून वंचीत वाडी रस्त्यांचा नव्याने अभ्यास करुन या वाटा कायम करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.
स्वातंत्रदिनी तालुक्यातील विविध समस्यांकरिता उपोषण केले होते त्यात हा प्रश्न प्रामुख्याने मांडला होता तहसलि कार्यालयाने या समस्येचा अभ्यास करुन त्यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले होते मात्र त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. प्रतिक्रीया सामाजीक कार्यकर्ते राजेश पांडुरंग गमरे शिरगाव













