देवरूख (प्रतिनिधी):
संगमेश्वर तालुक्यातील देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाचा सार्थक प्रकाश आडशे व ईश्वरी सचिन गुरव कोल्हापूर विभागीय शालेय मैदानी स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. डेरवण क्रीडा संकुलात आयोजित करण्यातआलेल्या जिल्ह्यातस्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत केलेल्या कामगिरीच्या आधारावर दोघांची कोल्हापूर विभागीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
डेरवण किडा संकुलात आयोजित जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत(१९वर्षाखालील गटात) सार्थक आडशे याने गोळाफेक प्रकारात प्रथम, तर ईश्वरी गुरव हिने १०० मीटर धावणे प्रकारात द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याने दोघांची डेरवण क्रीडा संकुलात संपन्न होणाऱ्या कोल्हापूर विभागीय शालेय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सार्थक आडशे याची सलग दोन वर्ष कोल्हापूर विभागीय शालेय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशासाठी महाविद्यालयात प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी दोन्ही विद्यार्थ्यांना सन्मानित करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
यशस्वी दोन्ही विद्यार्थ्यांना क्रीडा प्रशिक्षक संजय इंदुलकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी व्यवस्थापक म्हणून प्रा. स्वप्नाली झेपले यांनी उत्तम जबाबदारी फार पाडली. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, कनिष्ठ महाविद्यालय समिती अध्यक्षा सुजाता प्रभूदेसाई, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे, जिमखाना प्रमुख प्रा. विजय मुंडेकर, प्रा. प्रवीण जोशी, प्रा. अभिनव पातेरे, प्रा. देवयानी जोशी, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.













