वसुली कमी खर्च अधिक असल्याने घेतला निर्णय
रत्नागिरी : अनघा निकम मगदूम
रत्नागिरी नगर परिषदेने आजच्या सर्वसाधारण सभेत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे .
त्यानुसार तब्बल २४ वर्षांनंतर रत्नागिरी शहरातील पाणीपट्टीत मोठी करवाढ;
पाणीपट्टी आता १४ रुपये प्रति युनिट/लिटर!
नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत पाणी सभापती निमेश नायर यांनी मांडला करवाढीचा प्रस्ताव, त्याला सभागृहाची मंजुरी.
आर्थिक ताण पडल्याने निर्णय: वार्षिक ९ कोटींचा खर्च असताना वसुली होत होती फक्त ४ ते साडेचार कोटी.
मागील दर: यापूर्वी नागरिकांना प्रति लिटर मोजावे लागायचे ८ रुपये.
यातून नगर पालिकेचे उत्पन्न वाढणार आहे
तर पालिकेचे २५६ नळ कनेक्शनला मीटरच बसले नसल्याची धक्कादायक माहिती उघड
त्यांच्याबाबत योग्य निर्णय घेतला जाणार सभापतींची ग्वाही













