सिंधुदुर्ग : पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय, सिंधुदुर्ग येथे शैक्षणिक वर्ष २०२७-२८ साठी इयत्ता सहावीमध्ये प्रवेश घेण्यासाठी निवड प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परीक्षा शनिवार, २८ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १.३० या वेळेत निर्धारित परीक्षा केंद्रावर होणार आहे.
सांगेली येथील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षण मंत्रालय, भारत सरकारच्या वतीने ही परीक्षा आयोजित करण्यात येत आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी सकाळी १०.३० वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. तसेच परीक्षा केंद्रावर येताना प्रवेशपत्र आणि आधारकार्ड किंवा शाळेचे ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक आहे.
विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र https://navodaya.gov.in आणि https://cbseitms.rcil.gov.in/nvs या अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी ०२३६३-२४२७१३ या दूरध्वनी क्रमांकावर तसेच परीक्षा प्रमुख हेमंतकुमार जांभळे (८०८०२२७३३०) आणि एस. पी. हिरमठ (७४४७६०६१४९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विद्यालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.













