मसुरे | झुंजार पेडणेकर :पाण्याचे महत्त्व ओळखून जलसंवर्धनासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. याच विचारातून कोईळ गावातील रणरागिणींनी एकत्र येत ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून साकार केला आहे.
पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत जिरावे, भूजल पातळीत वाढ व्हावी आणि भविष्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, या उद्देशाने गावातील महिलांनी पुढाकार घेत बंधारा घातला. यावेळी
शर्मिला साटम, मानसी घाडी, रिया घाडी, माजी सरपंच सुरेखा साटम, मंजिरी साटम, दीपांजली साटम, मंदा साटम, सुचिता साटम, श्रद्धा साटम, सुप्रिया कबरे, उर्मिला आठवले, वसुंधरा कदम, राजश्री परब, शारदा साटम, गौरी साटम, सुप्रिया साटम , नम्रता साटम, सृष्टी कदम, माजी सरपंच श्याम साटम, संतोष कदम, शांताराम कदम जिल्हा परिषद शाळा कोईळ मुख्याध्यापक सुरवसे मॅडम, शिक्षक सुरवसे , ज्येष्ठ नागरिक शांताराम कदम, नारायण साटम आदीग्रामस्थ उपस्थित होते. ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या उक्तीप्रमाणे पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्याचा संदेश कोईळ गावातील या रणरागिणींनी दिला आहे.













