माखजन,आरवली परिसरातून समाधान
गौरव पोंक्षे माखजन
संगमेश्वर तालुक्यातून करजुवे सारख्या ग्रामीण भागातून थेट सोलापूरच्या अक्कलकोट मध्ये जाण्यासाठी परिवहन महामंडळाची बस सुरु झाली आहे.या प्रवासी सेवेबद्दल माखजन आरवली करजुवे परिसरातून समाधान व्यक्त केले जात आहे.
करजुवे येथून सकाळी पावणे सात वाजता ही बस अक्कलकोट ला जाण्यासाठी निघणार आहे.ही बस माखजन हून ७.३० वा. सुटेल.पुढे संगमेश्वर-देवरुख मार्गे कोल्हापूर- सांगली-मिरज- सांगोला -पंढरपूर – मोहोळ-सोलापूर -अक्कलकोट अशी जाणार आहे.हिच बस ह्याच मार्गे प्रतिदिनी अक्कलकोट हून सकाळी पावणे आठ वाजता सुटून करजुवे कडे प्रस्थान करणार आहे.ही बस देवरुख डेपोची असणार आहे.
तर कुरुंदवाड आगाराची कुरुंदवाड माखजन अशी बस सेवा पुन्हा सुरु झाली आहे.कुरुंदवाड हून सकाळी ६.३० वाजता माखजन साठी निघणार आहे.कुरुंदवाड हून सुटल्यावर नृसिंहवाडी -कोल्हापूर-मलकापूर आंबा मार्गे देवरुख माखजन अशी पोहचेल तर हिच बस,दुपारी २.४५ वाजता ह्याच मार्गे पुन्हा माखजन कुरुंदवाड म्हणून सुटेल.
ह्या बसेस सुरु करण्यासाठी प्रवासी संघटना माखजन विभागाचे कार्याध्यक्ष संतोष पाडळकर, माखजन चे सरपंच महेश बाष्टे, यांच्या सह अनेकांनी प्रयत्न केले.अनेक पत्रव्यवहार व पाठपुरावा केल्याने या बसेस या मार्गांवर धावत आहेत.या बसेस कायम स्वरूपी चालाव्यात अशी माखजन सह करजुवे,आरवली व संगमेश्वर तालुक्यातील प्रवाशांची मोठी मागणी आहे.
करजुवे अक्कलकोट बसफेरी मार्गस्थ होताना वाहक व चालकांना प्रवासी संघटनेतर्फे व माखजन ग्रामपंचायती तर्फे नारळाचे रोप देण्यात आले.बसला हार घालून, बसची पूजा करून श्रीफळ वाढवण्यात आले.यावेळी महेश बाष्टे,संतोष पाडळकर, भाई मोरे, काका तांबे,हरी करंजेकर, सदानंद चव्हाण,अभिजित सहस्त्रबुद्धे, कृष्णा पाटील व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
या बस सेवा चालू झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.













