वागदे केंद्रशाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा ३ नोव्हेंबरला गुणगौरव सोहळा

 

कणकवली : जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वागदे येथील विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार समारंभ मंगळवार, ३ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.

 

हा कार्यक्रम सकाळी १० वाजता ग्रामपंचायत हॉल, वागदे येथे संपन्न होणार आहे. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून शाळेचा नावलौकिक वाढविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देणे, हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

 

या गुणगौरव सोहळ्याला पत्रकार बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन वागदे ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप रमाकांत सावंत यांनी केले आहे.