मंडणगडमध्ये दिवाळीनिमित्त युवासेनेकडून भव्य किल्ले सजावट स्पर्धेचे आयोजन; इतिहासाचा जागर

मंडणगड प्रतिनिधी : दिवाळी सणाचे औचित्य साधून आपल्या गड-किल्ल्यांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी युवासेना मंडणगडच्या वतीने भव्य “किल्ले सजावट स्पर्धा” चे आयोजन करण्यात आले आहे. “किल्ले बांधा… स्वराज्य जपा…!!!”आणि “आपल्या इतिहासाचा अभिमान… आपल्या किल्ल्यांचा उत्सव!” हा या स्पर्धेमागचा मुख्य उद्देश आहे.

या स्पर्धेत विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत:
प्रथम क्रमांक – 3333/- रुपये व प्रमाणपत्र द्वितीय क्रमांक – 2222/- रुपये व प्रमाणपत्र तृतीय क्रमांक – 1111/- रुपये व प्रमाणपत्र
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 7 नोव्हेंबर 2026 पर्यंत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. तर स्पर्धेचे बक्षीस वितरण 12 नोव्हेंबर 2026 रोजी पंचायत समिती मंडणगड येथे  करण्यात येणार आहे. मंडणगड तालुक्यातील सर्व शाळा, विद्यार्थी आणि युवकांना या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या कलागुणांना वाव द्यावा, असे आवाहन या निमीत्ताने युवा सेना मंडणगड यांनी केले आहे.श्री. सुरज घोसाळकर
श्री. प्रशांत दिवेकर श्री. आदित्य घोरपडे श्री. सागर जाधव यांच्याशी संपर्क साधावा