गुहागर प्रतिनिधी :
खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या विकास कामांच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन गुहागर शहरातील महाविकास आघाडीच्या विद्यमान नगरसेविका मा.सौ. कोमलताई जांगळी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यावेळी त्यांच्या सोबत त्यांच्या प्रभागातील दर्शन जागळी, विक्रांत सांगळे, ओंकार सांगळे, कल्पेश जांगळी, मनोहर जांगळी, युवकांचा तसेच कीर्तनवाडी येथील स्वप्निल मुकनाक , संदीप फटकरे, महेंद्र जोशी यादी युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.
यावेळी गुहागर मधील विविध विकास कामांवर चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे मधील प्रमुख पदाधिकारी खासदार सुनील तटकरे साहेब, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, जिल्हा परिषद सदस्य श्री.अजयशेठ बिरवटकर, महिला जिल्हाध्यक्षा सौ. साधनाताई बोत्रे, सौ. रमा बेलोसे, श्री. जयंत जळगावकर, तालुकाध्यक्ष साहिल आरेकर, शहराध्यक्ष मंदार कचरेकर, नगरसेवक सौरभ भागडे, युवक अध्यक्ष संदेश भागडे, सेक्रेटरी संतोष जोशी, जिल्हा उपाध्यक्ष श्रीधर बागकर, कार्याध्यक्ष माधव साटले, आर्यन वराडकर, दीपक शीरधनकर, वेदांत पडवळ तसेच कार्यकर्ते उपस्थितीत होते.













