कणकवली -एस टी विभागीय कार्यालयातील सेवानिवृत्त कर्मचारी वासुदेव कृष्णाजी सावंत (वय ८४, रा. स्टेट बँक कॉलनी, कणकवली) यांचे दीर्घ आजाराने घावनळे येथे सोमवारी पहाटे निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, विवाहित मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. कणकवलीतील बांधकाम व्यावसायिक कैलास सावंत यांचे ते वडील होत. सायंकाळी कलमठ गावडेवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.













