कणकवली तालुक्यात जलतारा व शोषखड्डा मोहिमेला प्रारंभ

सर्व ग्रामपंचायतींनी उद्दिष्टपूर्ती करावी – सभापती हर्षदा वाळके

कणकवली : तालुक्यात जलतारा व शोषखड्डा मोहिमेचा शुभारंभ तालुक्याच्या सभापती हर्षदा वाळके यांच्या हस्ते करण्यात आला. नांदगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या शोषखड्डा व जलतारा कामांचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.

 

या मोहिमेच्या माध्यमातून पावसाचे पाणी जमिनीत जिरवून भूजल पातळी वाढविणे आणि जलसंधारणाला चालना देणे हा उद्देश आहे. कणकवली तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींनी जलतारा व शोषखड्ड्यांची कामे सातत्याने हाती घेऊन निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करावे, असे आवाहन सभापती हर्षदा वाळके व उपसभापती सोनू सावंत यांनी यावेळी केले.

 

यावेळी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सरपंच रविराज मोरोजकर, ग्रामविकास अधिकारी, तांत्रिक सहाय्यक, लाभार्थी तसेच ग्रामरोजगार सहाय्यक आदी उपस्थित होते.