सावंतवाडीतील जेष्ठ व्यापारी साईनाथ मुंज यांचे निधन

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी शहरातील जेष्ठ व्यापारी साईनाथ राजाराम मुंज ( वय ६७ ) यांचे आज शनिवारी गोवा – बांबुळी येथे उपचारादरम्यान निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी ,मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. सावंतवाडीतील चेतन कम्युनिकेशनचे संचालक श्रेयस मुंज यांचे ते वडील होत.