जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा वेरळ मधील घटना, एकावर गुन्हा दाखल
लांजा (प्रतिनिधी) : दारू पिऊन आलेल्या ग्रामस्थाने शाळेत धिंगाणा करत शाळेतील दोन्ही शिक्षकांच्या शर्टाची कॉलर पकडून त्यांना शिवीगाळ केल्याची घटना मंगळवारी ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.४५ वाजण्याच्या सुमारास वेरळ जिल्हा परिषद शाळेत घडली आहे. धिंगाणा घालणाऱ्या ३८ वर्षीय व्यक्तीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतची फिर्याद नंदकुमार बळीराम भागवत (वय ५३, शिक्षक वेरळ मराठी शाळा, राहणार लांजा धावणेवाडी) यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिली आहे. मंगळवारी सायंकाळी नंदकुमार भागवत हे दैनंदिन रजिस्टर भरण्याचे शासकीय काम करीत असताना दारू पिऊन शाळेत आलेल्या कुणाल शांताराम कुर्णेकर (वय ३८, राहणार वेरळ गायदडीवाडी) हा दारू पिऊन शाळेत आला. त्यानंतर शिक्षक नंदकुमार भागवत यांच्या डाव्या कानावर थोपटाने मारून सहज तसेच सहशिक्षक यांना यांच्या शर्टाची कॉलर पकडून शिवीगाळ केली. सर भागवत यांची देखील शर्ट पकडून धकलाबुकल केली.
अशाप्रकारे शासकीय कामात अडथळा आणला म्हणून कुणाल शांताराम कुर्णेकर याच्यावर भारतीय न्याय संहिता १३२, १३१, १२१(१), ३५२, ३५१(२), महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ८५(१) (२), प्रमाणे भा.द.वि.३५३, ३५२,३३२,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास जाधव हे करत आहेत.












