तर कोकणची लोककला नमन १० नोव्हेंबर संपन्न होणार
दीपप्रज्वलन, आरती, पारंपरिक नमन आणि स्थानिक भजनांची मेजवानी; श्रीराम दीपोत्सव मंडळाकडून जय्यत तयारी
गुहागर : श्रीराम भक्तीचा जागर आणि आपल्या पारंपरिक संस्कृतीचा वारसा जतन करण्याच्या उद्देशाने मौजे नरवण, ता. गुहागर, जि. रत्नागिरी येथे श्रीराम दीपोत्सव मंडळाच्या वतीने रविवार, दिनांक ८ नोव्हेंबर ते बुधवार, दिनांक ११ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत श्रीराम दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
२००८ साली स्थापना झालेल्या या मंडळाचा यंदा १९ वा दीपोत्सव साजरा होत असून, या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे.
कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :
रविवार, ८ नोव्हेंबर २०२६
सायंकाळी ७.३० वाजता दीपप्रज्वलन व आरती होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून श्री. प्रणवजी पोळेकर साहेब व श्री. निलेशजी सुर्वे साहेब उपस्थित राहणार आहेत.
सोमवार, ९ नोव्हेंबर २०२६
सायंकाळी ७.३० वाजता आरती.
मंगळवार, १० नोव्हेंबर २०२६
सायंकाळी ७.३० वाजता आरती, तर रात्री १० वाजता साई समर्थ सेवा मंडळ, सळपेेवाडी – गुहागर (चिंद्रावळे) निर्मित व साई कलामंच सळपेेवाडी प्रस्तुत पारंपरिक प्रबोधनवादी नमन हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
बुधवार, ११ नोव्हेंबर २०२६
सायंकाळी ७.३० वाजता आरती व स्थानिक भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या दीपोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक श्रद्धेसोबतच सामाजिक एकोपा, सांस्कृतिक परंपरा आणि भक्तिमय वातावरण निर्माण करण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. परिसरातील सर्व रामभक्त, ग्रामस्थ, महिला मंडळे, तरुण मंडळे आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दीपोत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्रीराम दीपोत्सव मंडळ, नरवण यांच्या वतीने करण्यात आले आहे.॥ श्रीराम प्रसन्न ॥आपले नम्र – श्रीराम दीपोत्सव मंडळ, नरवण सर्व भाविकांनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.













