भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष ​अच्युत सावंत भोसले यांना पितृशोक

​दोडामार्ग : भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष श्री. अच्युत सावंत भोसले यांचे वडील श्री. कुड यशवंत सावंत भोसले (वय ९२) यांचे काल रात्री अल्पशा आजाराने मणिपाल हॉस्पिटल, गोवा येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे दोडामार्ग तालुक्यासह शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

​स्व. कुड सावंत भोसले हे एक प्रगतीशील बागायतदार म्हणून सर्वपरिचित होते. शेती क्षेत्रातील प्रयोगांमुळे त्यांचा मोठा जनसंपर्क होता. तसेच त्यांनी श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य म्हणूनही दीर्घकाळ जबाबदारी सांभाळली होती. संस्थेच्या प्रगतीत त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले होते.

​त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा अच्युत सावंत भोसले, सून, तीन मुली, जावई, भाऊ, भावजय, पुतणे, पुतण्या व नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने सावंत भोसले परिवारावर मोठी शोकछाया पसरली आहे.त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी १०.३० वाजता शिरवल (ता. दोडामार्ग) येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.