माणिक चौक येथे सायंकाळी रंगणार दीपावली विशेष कार्यक्रम..
वेंगुर्ले : दाजी नाईक
दीपावली सणाचे औचित्य साधून माणिक चौक, वेंगुर्ले येथील शिवप्रेमी मित्र मंडळातर्फे मंगळवार, दि. १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता भव्य ‘समई नृत्य स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे.
दीपावलीच्या उत्साहात पारंपरिक कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन मिळावे, तसेच स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. समई नृत्याच्या माध्यमातून दीपोत्सवाचा आनंद द्विगुणित होणार असून या कार्यक्रमाला नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
माणिक चौक, वेंगुर्ले येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कलाकारांचा उत्साह वाढवावा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे नम्र निमंत्रण शिवप्रेमी मित्र मंडळाने दिले आहे.
या मंडळाचे अध्यक्ष रोहित वेंगुर्लेकर, उपाध्यक्ष नितीश कुडतरकर, खजिनदार प्रथमेश यंदे आणि कार्याध्यक्ष विनय गोगटे असून त्यांनी सहकाऱ्यांच्या पुढाकाराने या दीपावली विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.













