चिपळूण (वार्ताहर) : कुणबी समाजोन्नती संघ मुंबई संलग्न कुणबी युवा मुंबई यांच्या वतीने आयोजित केलेल्या बळी पहाट या कार्यक्रमात कुणबी समाजाचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि संघाचे माजी पदाधिकारी राजाभाऊ कातकर यांना “जीवन गौरव पुरस्कार” देऊन गौरवण्यात आले. यावेळी मातृसंस्थेचे अध्यक्ष अनिल नवगणे उपस्थित होते.
चिपळूण तालुक्यातील रामपूर कातकरवाडी येथील ज्येष्ठ कुणबी नेते राजाभाऊ कातकर यांनी समाजाच्या मातृसंस्थेचा कार्यभार सुद्धा पहिला आहे. चिपळूण संघ शाखा मुंबई आणि ग्रामीण शाखेचे ते मार्गदर्शक आहेत. समाजातील अनेक आंदोलने आणि समस्या सोडविण्यासाठी त्यांनी योगदान दिले आहे. कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांच्या समवेत त्यांनी काम केले आहे. एक हरहुन्नरी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी आजवर केलेल्या कामाची दखल घेत कुणबी युवा मुंबई यांनी राजाभाऊ कातकर यांना बळी पहाट कार्यक्रमात त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी संघाध्यक्ष अनिल नवगणे, चंद्रकांत बावकर, चंद्रकांत कोकमकर, बारकु बेंडल, निलेश कोकमकर आणि संघाचे पदाधिकारी व युवाची सर्व टीम उपस्थित होती.













