शहराचे पाणी पुरवठा, नमो उद्यान व स्वच्छतागृहाचे भूमीपुजन
मंडणगड प्रतिनिधी :
लोकप्रतिनिधी या नात्याने जनतेच्या पायाभुत विकासाची कामे हा माझ्यासाठी श्रेयवादाचा मुद्दा नाही, कोकणातून रोजगाराकरिता होणारे स्थलांतर रोखण्यासाठी केंद्र व राज्याचे पातळीवर धोरणात्मक निर्णय व दीर्घकालीन उपाययोजना हा माझ्यासमोर अग्रक्रमाचा मुद्दा असल्याने व त्या दृष्टीने मी कार्यरत असल्याचे प्रतिपादन रायगड रत्नागिरी लोकसभा मतदान क्षेत्राचे खासदार सुनील तटकरे यांनी मंडणगड येथे केले. मंडणगड नगरपंचायत व राष्ट्रवादी कॉंग्रेसपार्टीच्यावतीने 12 नोव्हेंबर 2026 रोजी नळपाणी योजना, नमो उद्यान व स्वच्छता गृह या महत्वाचे विकासकामांचे भूमीपूजन श्री. तटकरे यांच्याहस्ते करण्यात आले या निमीत्ताने आयोजीत स्वागत व सत्कार सोहळ्यात ते बोलत होते यावेळी ते पुढे म्हणाले 2014 सालानंतर ग्रामिण भागाचे शहरीकरण तेथील पायभुत व जुनसुविधांचा विकास हे केंद्र व राज्य शासनाचे अग्रक्रमाचे मुद्दे राहीले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंडणगड ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर झाले असून नगरपंचायत दुसऱ्या टप्यात जनतेने ठेवलेला विश्वास सार्थ ठरवून सत्ताधाऱ्यांनी केलेली विकासकामे शहराचे दीर्घकालीन विकासाचे प्रक्रीयेत महत्वपुर्ण ठरणारी आहेत. नागरीकांच्या उपयोगी ठरणारी आहेत. केवळ विकासावर बोलते श्री. तटकरे यांनी स्थानीक राजकारण व विरोधकांवर बोलणे यावेळी टाळले. यावेळी नगराध्यक्षा सोनल बेर्डे, उपनगरध्यक्ष वैभव कोकाटे जिल्हा नियोजन समिती सदस्य केदार साठे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे निमीत्ताने नळपाणी योजनेस जागे देणाऱ्या पाच नागरीकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष बाबाजी जाधव, तालुका अध्यक्ष मुझफ्फर मुकादम, जिल्हा परिषद सदस्य अजय बिरवटकर, नगराध्यक्षा सोनल बेर्डे, जिल्हा नियोजन समिती सदस्य केदार साठे, दापोली पंचायत समिती सदस्य श्रीराम इदाते, संदीप राजपूरे, साधना बोतरे, माजी सभापती भाई पोस्टुरे, प्रकाश शिगवण, मुश्ताकर मिरकर, युवक अध्यक्ष साईराज सावंत, रमा बेलोसे, मुजीब रुमाणे, अपुर्वा जाधव, मुख्याधिकारी महादेव रोडगे, नगसेविका राजश्री सापटे, मनीषा हातमकर, रेश्मा मर्चंडे,प्रियांका लेंडे, हरेष मर्चंडे, दीनेश लेंडे, तसेच सर्व नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.













