यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय धामणंद येथे नूतन विद्यालयास भरघोस मदत

शिक्षणमहर्षी अनंत पालांडे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

चिपळूण (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील पंधरागाव विभाग जनता माध्यमिक शिक्षण संस्था धामणंद संचलित यशवंत विद्यालय धामणंद येथे नूतन विद्यालयास नुकतीच भरघोस मदत देण्यात आला. पंधरागाव विभागमधील सामाजिक व्यक्तिमत्व बबनराव जाधव व सुभाष जाधव यांचे जावई संजीव चव्हाण रिटन मायर प्रा.लिमिटेड कंपनी रिजनल ऑफिसर यांच्याकडून साडेतीन लाख रुपयांची नूतन शाळा इमारतीसाठी देणगी देण्यात आली.
या देणगीबद्दल सौ. कुसुम सुभाष जाधव व सुभाष जाधव यांच्या दातृत्वाबद्दल, शिक्षण संस्था धामणंदच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच शिक्षणमहर्षी अनंतराव पालांडे यांना सह्याद्री समाचार वृत्त वाहिनीच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार प्रदान केल्याबद्दल पंधरागाव विभाग जनता माध्यमिक शिक्षण संस्था धामणंदच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी अनंतराव पालांडे शिक्षण संस्था सचिव, संदीप म्हापदी, खजिनदार संतोष उतेकर, पंधरागाव विभाग जनता सेवा संघ अध्यक्ष, प्रवीण जाधव, श्रीराम सेवा संघ अध्यक्ष, संदीप पालांडे, निलेश जाधव, विठ्ठल जाधव, शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष, शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. कसबे यांनी तर आभार श्री. भांदिगरे यांनी मानले.