राजापूरमध्ये मोफत आरोग्य तपासणी व उपचार मार्गदर्शन शिबिर

सनराईज हॉस्पिटल, कोल्हापूरचा पुढाकार

राजापूर प्रतिनिधी : जिल्ह्यातील नागरिकांसाठी सनराईज हॉस्पिटल, कोल्हापूर यांच्या वतीने राजापूर येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, 19 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत ग्रामीण रुग्णालय, राजापूर येथे हे शिबिर पार पडणार आहे.
या शिबिरात हृदयविकार, मुतखडा, प्रोस्टेट, पित्ताशयातील खडे, व्हेरिकोज व्हेन्स (फुगलेल्या नसा) तसेच मणक्याच्या आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व पुढील उपचारांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत (MJPJAY) पात्र रुग्णांना विविध उपचारांचा लाभ मिळवून देण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. यामध्ये अँजिओप्लास्टी, लहान छिद्रातून बायपास शस्त्रक्रिया (MICS CABG), दुर्बिणीद्वारे मुतखडा व प्रोस्टेटवरील उपचार, पित्ताशयातील खड्यांवरील शस्त्रक्रिया, लेसरद्वारे व्हेरिकोज व्हेन्स उपचार आणि मणक्याच्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे.
याशिवाय थायरॉईडमधील गाठी तसेच गर्भाशयातील गाठींवरील उपलब्ध आधुनिक उपचार पद्धतींबाबतही तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिबिराला येताना नागरिकांनी रेशन कार्ड, आधार कार्ड, आयुष्मान कार्ड तसेच यापूर्वीचे वैद्यकीय रिपोर्ट सोबत आणावेत. नावनोंदणी व अधिक माहितीसाठी 8928736999 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सनराईज हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.