भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त भाजपातर्फे पंदेरी आदिवासी वाडीत विविध कार्यक्रमांचे आयोजन

जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, जिल्हा सरचिटणीस वसंजी ताम्हणकर यांची प्रमुख उपस्थिती; भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन

मंडणगड (प्रतिनिधी): आदिवासी समाजाचे महानायक, स्वातंत्र्यसेनानी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी तालुका शाखा मंडणगड यांच्या वतीने रविवार, १५ नोव्हेंबर २०२६ रोजी पंदेरी आदिवासी वाडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमाला भाजपा रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष सतीश मोरे तसेच जिल्हा सरचिटणीस वसंजी ताम्हणकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून आदिवासी समाजाचे योगदान, त्यांचा संघर्ष, स्वाभिमान आणि सामाजिक कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी सकाळी ठीक ११ वाजता पंदेरी आदिवासी वाडी येथे कार्यक्रमाला प्रारंभ होणार असून, भाजपा मंडणगडमधील सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, विविध आघाड्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी मंडणगडच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचा तपशील :
दिनांक : रविवार, १५ नोव्हेंबर २०२६
वेळ : सकाळी ११ वाजता
स्थळ : पंदेरी आदिवासी वाडी, मंडणगड
आयोजक : भारतीय जनता पार्टी, मंडणगड