पावस येथे शेख महंमद पीर उरूसास दि.22 नोव्हेंबर पासून प्रारंभ

गावखडी /वार्ताहर :
रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र पावस येथे हजरत शेख महंमद पीर उरूसाचा प्रारंभ दि.22नोहेबर 2026रोजी होणार आहे .हजरत महंमद पीर याच्या समाधीला 225 वर्षाचा परंपरेचा वारसा लाभला असून, हा उरूस दरवर्षी कार्तिक पौर्णिमाच्या दिवशी मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो.
उरूसाच्या पहिल्या दिवशी दि.22नोहेबर 2026 रोजी रात्री 10.30वा.मिरवणूकी नंतर समाधीवर चंदन चढवून धार्मिक विधीचा शुभारंभ होणार आहे .
दि.23नोहेबर 2026रोजी रात्री 11वा.समाधीवर सामुदायिक पद्धतीने महावस्त्र (गिलाफ)परिधान करण्याचा सोहळा होईल .
उरूसाचा सांगता समारंभ दि.24नोहेबर 2026रोजी भाविकांना दर्शनासोबत महाप्रसाद रात्री 7.30 ते रात्री 10पयत आहे.
हजरत शेख महंमद पीर हे जागृत देवस्थान मानले जाते.नवस फेडण्यासाठी आणि आशिर्वाद घेण्यासाठी सर्व धर्मीय भाविक दरवर्षी पावस येथे मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहतात. भाविकांच्या सोयीसाठी चहा,थंड पेय, खाद्यपदार्थ आणि प्रसाद साहित्याची दुकानाने सज्ज होत असून ,तीन दिवस परिसरात उत्सवी वातावरण अनुभवता येते .
या धार्मिक सोहळ्याचे व्यवस्थापन शेख महंमद पीर दर्गा
ट्रस्ट पावस पाहत आहे.
मुस्लीमीन दख्खनी मोहल्ला व दर्गाचे मुजावर दाऊद महमूद मुजावर
सर्व भाविकांनी उरूसास मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे .