मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे रत्नागिरीत देवदर्शन; गोवळकोटच्या करंजेश्वरीचे सपत्नीक दर्शन

रत्नागिरी :
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील सध्या खासगी कोकण दौऱ्यावर आहेत. आज सकाळी त्यांनी चिपळूणमधील गोवळकोट येथील श्रीदेवी करंजेश्वरीचे सपत्नीक दर्शन घेतले. काल रात्री चिपळूणमध्ये दाखल झालेल्या मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या दौऱ्यात देवदर्शनाला विशेष महत्त्व आहे. करंजेश्वरी देवीच्या दर्शनानंतर ते गुहागर येथील प्रसिद्ध दुर्गादेवी आणि वाडेश्वर मंदिरातही दर्शन घेणार आहेत. त्यांच्या या खासगी कोकण दौऱ्याची परिसरात चर्चा सुरू आहे.