विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
लांजा (प्रतिनिधी) : तालुक्यातील ईसवली गावचे ग्रामदैवत श्री नवलादेवीच्या त्रिपुरारी पौर्णिमा उत्सवाला सुरुवात झाली असून २४ नोव्हेंबर पर्यंत दररोज विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
इसवली येथील नवलादेवी चा त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो. यावर्षी देखील १९ नोव्हेंबर पासून या उत्सवाला सुरुवात झाली आहे. शनिवार दिनांक २१ नोव्हेंबर रोजी श्री ब्राह्मण देव नमन मंडळ पाथरवाडी यांच्या नमनाचा कार्यक्रम होणार आहे. रविवारी २२ नोव्हेंबर रोजी स्थानिक कार्यक्रम होणार आहे. सोमवारी २३ नोव्हेंबर रोजी शक्ती तुऱ्याचा जंगी सामना होणार आहे. यामध्ये विनेश वाजे बुवा गोविळ आणि देवेंद्र झिमण कोंडये यांच्यामध्ये हा सामना रंगणार आहे.
दिनांक २४ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव असून या दिवशी सायंकाळी सहा वाजता नवलादेवी चा त्रिपुर पाजळण्यात येईल. रात्री ९ वाजता श्री नवलादेवी भव्यतम सोडत लॉटरी चा निकाल (लकी ड्रॉ) जाहीर करण्यात येणार असून रात्री ११.३० वाजता प्रेमाचा गोलमाल हा नाट्य प्रयोग सादर केला जाणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे













