सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या रिक्त संचालक पदी
सौ. अंजली संतोष खताते यांची बिनविरोध निवड झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थाचे उपाध्यक्ष श्री. दिनेश खवले हे निवृत्त झाल्यामुळे भटक्या विमुक्त जाती / जमाती व विशेष मागासप्रवर्ग राखीव मतदारसंघाचे संचालक पद रिक्त झाले होते.
या पदाच्या निवडीसाठी रविवारी अध्यासी अधिकारी श्री. श्रीकृष्ण म. मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली संचालकांची सभा घेण्यात आली. यावेळी सौ. अंजली संतोष खताते यांचे नाव संचालक श्री. वासुदेव वि. वरवडेकर यांनी सुचविले. त्यास श्रीम. अनघा अ. तळावडेकर यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर मंजुर निवडणुक कार्यक्रमानुसार सदर पदासाठी एकच उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने सौ. अंजली संतोष खताते यांची
अध्यासी अधिकाऱ्यांनी सदर राखीव मतदारसंघासाठी संचालक म्हणून विजयी घोषित केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. कृष्णा आडणेकर, उपाध्यक्ष श्री. देविदास आडारकर,
संचालक श्री. वासुदेव वरवडेकर, श्री. राजेश चव्हाण, श्री. प्रविण सावंत, श्रीम. वर्षा मोहिते, श्रीम. अनघा तळावडेकर, श्री. राजेंद्र शिंगाडे, श्री. अमित गंगावणे, श्री. वंदन गावडे, श्री. चेतन गोसावी, श्री. विलास चव्हाण, श्री. बाळकृष्ण रणसिंग व श्री. राजन साळुंके उपस्थित होते. नवनिर्वाचित संचालक सौ. अंजली संतोष खताते यांनी संचालक पदी आपली निवड केल्याबद्दल सर्व संचालकांचे आभार मानले व यापूढे संस्थेची जास्तीत जास्त प्रगती होण्याच्या दृष्टीने आपण
सर्वोतोपरी प्रयत्न करू असे सांगितले. संस्थेचे सचिव श्री. निलेश ज. कुडाळकर यांनी अध्यासी अधिकारी श्री. मयेकर तसेच उपस्थित सर्व संचालकांचे आभार मानले व नवनिर्वाचित संचालक यांना शुभेच्छा दिल्या.













