# त्रिपुरी पौर्णिमा यात्रेत पालकमंत्री नितेश राणे यांचे श्री दीर्बादेवी-रामेश्वराचे दर्शन
देवगड : प्रतिनिधी
देवगड-जामसंडे गावचे ग्रामदैवत असलेल्या श्री दीर्बादेवी-रामेश्वर देवस्थानचा त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त सुरू असलेल्या यात्रा उत्सवात महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी आज भेट दिली. यावेळी त्यांनी श्री दीर्बादेवी व रामेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी देवस्थान ट्रस्टच्या वतीने ना. नितेश राणे यांचे स्वागत करण्यात आले. तसेच शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पाळीदार दीपक घाडी उपस्थित होते.
ना. राणे यांच्यासमवेत माजी आमदार अजित गोगटे, मंडल तालुकाध्यक्ष राजा भुजबळ, संदीप साटम, देवगड-जामसंडे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हरिदत्त माने, उपनगराध्यक्ष मिताली सावंत, शहराध्यक्ष वैभव कळंगुटकर ,गटनेते शरद ठुकरुल, सर्व नगरसेवक, योगेश चांदोसकर, दयानंद पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.













