मंडणगड चौकात इको गाडी धोकादायक स्थितीत उभी; वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल

 मंडणगड (प्रतिनिधी): मंडणगड शहरातील सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा धोकादायक स्थितीत इको गाडी उभी करून ठेवल्याप्रकरणी मंडणगड पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. २४ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास मंडणगड येथील सार्वजनिक रस्त्यावर (MH-46-AP-3096) क्रमांकाची इको गाडी उभी करण्यात आली होती. संबंधित वाहनामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या इतर वाहनचालकांसह पादचाऱ्यांना वाहतुकीचा अडथळा निर्माण होण्याची तसेच अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली होती.
या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी संबंधदास मावची(वय ३७) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मांदीवली, ता. दापोली येथील इफ्तिखार अब्दुल सलाम मुकादम (वय २५) याच्याविरोधात मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १४१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २८५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सार्वजनिक रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने वाहने उभी करणे हे वाहनचालकांसह इतर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते. त्यामुळे वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळून सार्वजनिक रस्ते मोकळे ठेवावेत, असे आवाहन या घटनेच्या निमित्ताने करण्यात येत आहे.