शृंगारतळी आबलोली मार्गावर बॉक्साइट वाहतूक करणारा ट्रॅक कलंडला सुदैवाने जिवीतहानी नाही

गुहागर प्रतिनिधी : गुहागर तालुक्यातील शृंगारतळी आबलोली मार्गावरिल पांगारी येथील जुगाई /गणपती मंदिराजवळील वळणावर बॉक्साइट वाहतूक करणारा ट्रॅक कलंडल्याची घटना मंगळवारी रात्री 11.45 वाजण्याच्या सुमारास घडली.
बॉक्साइटची वाहतुक करण्यासाठी निघालेला हा १६ टायरी ट्रक शृंगारतळी आबलोली मार्गावर पांगारी जुगाई/ गणपती मंदिर वळणावर रस्त्याच्या खाली गेला.मात्र सुदैवाने यामध्ये जीवीतहानी झाली नाही.दरम्यान यावेळी घटनास्थळी वाहतुक करणा-या लोकांना चालक व सहकारी मद्यपान केल्याचे आढळले. या मार्गावर वाहतूक करणारे हे ट्रक नेहमी जोरदार वेगाने जाणे, दुचाकी तसेच अन्य वाहनांना अयोग्य पद्धतीने साईड देणे असे प्रकार वारंवार घडत असतात .त्यामुळे या वाहतूक करणाऱ्या चालक, ट्रक यांची वेळोवेळी तपासणी करण्याची तसेच वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधित यंत्रणेने सूचना देण्याची मागणी या भागातील नियमित वाहतुकदार व ग्रामस्थांतून होत आहे.